नवी मुंबईतील अनधिकृत बांधकाम कारवाईला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

नवी मुंबईच्या गावठाण भागातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला मुख्यमंत्र्यांनी तूर्तास स्थगिती  दिलीय. 

Updated: May 9, 2015, 07:34 AM IST
नवी मुंबईतील अनधिकृत बांधकाम कारवाईला मुख्यमंत्र्यांची स्थगिती  title=
संग्रहीत

मुंबई : नवी मुंबईच्या गावठाण भागातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला मुख्यमंत्र्यांनी तूर्तास स्थगिती  दिलीय. 

भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये ९ मे  पासून सिडकोकडून सरसकट गावठाण भागात केली जाणारी कारवाई थांबवावी अनधिकृत बांधकामांचा सर्वे करून त्यानंतर कारवाई करण्यात यावी मागणी करण्यात आली होती. 

या नुसार २०० मीटर च्या अंतरातील गरजेपोटी बांधलेल्या घरांना वगळता इतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी समिती नेमावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली गेलीय. 

मुख्यमंत्र्यांनीही सिडकोच्या कारवाईला स्थगिती देत पुढील सिडकोच्या बैठकीत निर्णय घेण्याच आश्वासन दिलेय. यामुळे कारवाईला तूर्तास स्थगिती मिळाल्याने गावठाण भागातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. मात्र, अनधिकृत बांधकामाना मुख्यमंत्री पाठिशी का घालत आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.