कडवई रेल्वे स्टेशनसाठी ग्रामस्थांचा मोर्चा

 जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातमधील कडवई येथे रेल्वे स्टेशन व्हावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी मोर्चा काढला.

Updated: Jan 16, 2016, 01:54 PM IST
कडवई रेल्वे स्टेशनसाठी ग्रामस्थांचा मोर्चा title=

रत्नागिरी : जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातमधील कडवई येथे रेल्वे स्टेशन व्हावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी मोर्चा काढला.

गेले कित्येक वर्षापासून कडवई रेल्वे स्टेशनला रेल्वे बोर्डानं मंजुरी दिलीय. त्यासाठी एस्टीमेट सुद्धा करण्यात आलंय. मात्र रेल्वे स्टेशन होत नसल्यानं मोर्चाच्या माध्यमातून रेल रोकोचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.

कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून समर्पक उतरे न मिळाल्याने भडकलेल्या ग्रामस्थांनी मांडवी एक्स्प्रेस रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र संगमेश्वर पोलिसांनी हा डाव हाणून पाडला.