चंद्रपुरात दुर्मिळ सापांची तस्करी, तिघांना अटक

 शहरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका इंडिका वाहनातून दुर्मिळ जातीचा मालवण साप पकडण्यात पोलिसांना यश आलंय. अनेक दिवसांपासून  तस्करी होत असल्याचा पोलिसांना संशय होता.

Updated: Jan 16, 2016, 01:56 PM IST
चंद्रपुरात दुर्मिळ सापांची तस्करी, तिघांना अटक title=

 चंद्रपूर : शहरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका इंडिका वाहनातून दुर्मिळ जातीचा मालवण साप पकडण्यात पोलिसांना यश आलंय. अनेक दिवसांपासून  तस्करी होत असल्याचा पोलिसांना संशय होता.

या प्रकरणी तेलंगणा राज्यातल्या ३ आरोपींना अटक करण्यात आली असून, या सापाची किंमत लाखोंच्या घरात असल्याचं सांगण्यात आलंय.

गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी आणि काही आयुर्वेदिक औषधांमध्ये उपयोग करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून वन्यप्राण्यांची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यापैकीच हा प्रकार असल्याचं पोलिसांनी सांगितले.