नागपूर : महाराष्ट्र दिनी १ मे रोजी काही विदर्भवादी संघटना काळा दिवस पाळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
१ मे रोजी काळा दिवस पाळण्यात येणार आहे, अशी माहिती अशी माहिती 'विदर्भ कनेक्ट'चे अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ यांनी दिली. या प्रकारामुळे राज्याचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता वाढली आहे.
१ मे रोजी विदर्भवादी संघटनांतर्फे सर्व ११ जिल्ह्यांतील मुख्यालयी विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनी संपूर्ण विदर्भात काळा दिवस पाळण्यात येणार आहे.
राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे हे स्वत: नागपूरात विदर्भाचा झेंडा फडकविणार आहेत.