वसई-विरार महापालिकेवर बविआचा झेंडा, युतीची नामुष्की

वसई-विरार महापालिका निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने पुन्हा एकदा बाजी मारत स्पष्ट बहुमत मिळवले. तर शिवसेना-भाजप युतीचा या निवडणुकीत फुसका बार उडाला. युतीला केवळ ७ जागाच जिंकता आल्यात.

Updated: Jun 16, 2015, 03:34 PM IST
वसई-विरार महापालिकेवर बविआचा झेंडा, युतीची नामुष्की title=

पालघर : वसई-विरार महापालिका निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने पुन्हा एकदा बाजी मारत स्पष्ट बहुमत मिळवले. तर शिवसेना-भाजप युतीचा या निवडणुकीत फुसका बार उडाला. युतीला केवळ ७ जागाच जिंकता आल्यात.

पालिकेच्या एकूण ११५ जागा असलेल्या वसई-विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीचीच सत्ता आली आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच बहुजन विकास आघाडीने आघाडी घेतली होती. 

३० पेक्षा जास्त जागा नक्कीच जिंकू, असा विश्वास शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे यांनी व्यक्त केला होता. प्रत्यक्षात शिवसेनेला दोन अंकी दहा जागांचा आकडाही गाठता आला नाही. शिवसेनेचे केवळ सहाच उमेदवार विजयी झाले. काँग्रेसला या निवडणुकीत एका जागेवर विजय मिळवता आला आहे, तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. वसई-विरार महापालिकेसाठी ४९ टक्के मतदान झाले होते.

पक्षीय बलाबल
बहुजन विकास आघाडी - १०५
शिवसेना - ६
भाजप - १
काँग्रेस - १
अपक्ष - २
एकूण - ११५

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.