मी सर्व प्रकारच्या चौकशीला तयार - भुजबळ

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या घरावर तसेच कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे, एसीबीने ही कारवाई केली आहे. एसीबीच्या १५ टीम्सने १७ ठिकाणी हे छापे टाकले आहेत.

Updated: Jun 16, 2015, 07:48 PM IST
मी सर्व प्रकारच्या चौकशीला तयार - भुजबळ title=

सायंकाळी ६.३० वाजता

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात... 

- भुजबळांवरील कुठलीही कारवाई आकसाने नाही

ठोस पुरावे मिळाल्यानंच कारवाई

ज्यांच्याविरोधात पुरावे त्यांच्याविरोधात कारवाई

- 'आगे आगे देखो होता है क्या'

 

अपडेट सायंकाळी ५ वाजून ११ मिनिटांनी

छगन भुजबळ यांच्या नाशिक, मुंबई, येवला या ठिकाणच्या निवासस्थानांवर एसीबीने छापे टाकल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देतांना सांगितलं

मी सर्व प्रकारचा हिशेब देण्यास तयार आहे, चौकशीला संपूर्ण सहकार्य करतोय - भुजबळ

मी एक रूपयाचा देखिल भ्रष्टाचार केला नसल्याचा भुजबळांचा दावा

सर्व घरं ही माझ्या मालकीची नाहीत, माझ्या नातेवाईकांची आहेत

यातील काही प्रॉपर्टी ही वडलोपार्जित असल्याचंही भुजबळांनी म्हटलं आहे.

भुजबळ यांची मालमत्ता

> नाशिक येथे चंद्राई बंगला, भुजबळ पॅलेस, भुजबळ फार्म,

येवला व मनमाड येथे कार्यालय व बंगला,

मुंबईत वरळी येथे सुखदा सोसायटीत १२०० चौरस फुटांचा फ्लॅट,

चर्चगेट येथील मानेक महल येथे अडीच हजार चौरस फुटांची कार्यालये,

नवी मुंबईत दुकाने, नाशिक येथे वीज कंपनी,

> दादर परिसरात व्यापारी इमारती, सांताक्रूझ येथे निवासी इमारत,

लोणावळा येथे सुमारे ६५ एकर भूखंड, येवला व बाभुळगाव येथे अनुक्रमे सुमारे २६ व ६५ एकर भूखंड, उज्जनी येथे ३५० एकर भूखंड आदी.

दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी 

छगन भुजबळांच्या दादर सांताक्रुझ, नाशिक, येवला येथील घर कार्यालयांवर छापे, नाशिकमध्ये छापे टाकून टीम मुंबईच्या दिशेने

दुपारी १ वाजता

नाशिक : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या घरावर तसेच कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे, एसीबीने ही कारवाई केली आहे. एसीबीच्या १५ टीम्सने १७ ठिकाणी हे छापे टाकले आहेत.

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी हे छापे टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे, मागील अनेक दिवसांपासून छगन भुजबळ आणि महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाची चर्चा होती. यानंतर आज पहिल्यांदा छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील घरांवर तसेच संपर्क कार्यालयावर हे छापे टाकण्यात आले आहेत.

छगन भुजबळ यांच्या घरांवर छापे टाकण्यात आल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं सांगण्यात आले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.