VIDEO : आराराराराSSSSS... पाहा वसईच्या 'झॅकपॅक' बाबाची भोंदूगिरी

अनेक दुर्धर आजारांना स्टेजवर चुटकीसरशी दूर करणारा एक 'झॅकपॅक' बाबा वसईत पाहायला मिळतोय. सबॅस्टियन मार्टिन असं या भोंदूबाबाचं नाव आहे. 

Updated: Jan 30, 2016, 10:14 AM IST
VIDEO : आराराराराSSSSS... पाहा वसईच्या 'झॅकपॅक' बाबाची भोंदूगिरी title=

वसई : अनेक दुर्धर आजारांना स्टेजवर चुटकीसरशी दूर करणारा एक 'झॅकपॅक' बाबा वसईत पाहायला मिळतोय. सबॅस्टियन मार्टिन असं या भोंदूबाबाचं नाव आहे. 

स्वत:ला डॉक्टर म्हणवणाऱ्या सेबॅस्टिन मार्टिन हा 'आशिर्वाद प्रेअर सेन्टर'चा संस्थापक आहे. आपल्याकडे असणाऱ्या कथित दैवी शक्तीच्या माध्यमातून आपण लोकांचे असाध्य आजार बरे करतो, असं हा भोंदू बाबा सांगतो. 

ब्रेस्ट कॅन्सर, तापानं फणफणणं, जुलाब, हाडं दुखणे, फुफ्फुसाचे आजार यांसारखे अनेक आजार दूर करणं, इतकंच काय तर नोकरी न मिळणाऱ्या व्यक्तीलाही हा झॅकपॅक बाबा नोकरी मिळवून देतो... प्रभू या व्यक्तींना स्पर्श करतो आणि मग दैवी चमत्कारानं त्यांचे सगळे प्रश्न सुटतात, असं तो सांगतो.

परंतु, हे मानसशास्त्रीय चमत्कार असू शकतात पण, त्याला जे दैवी स्वरुप दिलं जातं ते चुकीचं आहे असं फादर मायकल गोन्साल्विस यांनी म्हटलंय. 

सबॅस्टियन मार्टिनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडिया आणि यूट्यूबवर दिसत आहेत. त्याच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येतेय.