विद्यार्थीनी आत्महत्या प्रकरणी शिक्षिकेला अटक

वर्ध्यातील केसरीमल कन्याशाळेत शिकणा-या निकिता अंदस्कर या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी एका शिक्षिकेला अटक करण्यात आलीय.

Updated: Feb 2, 2016, 06:46 PM IST
 विद्यार्थीनी आत्महत्या प्रकरणी शिक्षिकेला अटक  title=

वर्धा : वर्ध्यातील केसरीमल कन्याशाळेत शिकणा-या निकिता अंदस्कर या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी एका शिक्षिकेला अटक करण्यात आलीय.

 या शिक्षिकेला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. वर्ग मैत्रिणीनं निकीतावर मोबाईल चोरल्याचा आळ घेतला होता.  ही बाब वर्गशिक्षिकेपर्यंत पोहचली..

 यावेळी निकीतानं मोबाईल चोरलं नसल्याचं शिक्षिकेला वारंवार सांगितलं... मात्र शिक्षिकेनं तिचं ऐकलं नाही.. संपूर्ण वर्गात झालेल्या अपमानामुळं व्यथित झालेल्या निकीतानं आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. 
 
 आत्महत्येला शिक्षिका जबाबदार असल्याचा उल्लेख निकीताच्या सुसाईड नोटमध्ये आढळलाय.

पाहा व्हिडिओ