नाशिकमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील पश्चिम मोसम खोऱ्यातील गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले.

Updated: Apr 30, 2017, 06:54 PM IST
नाशिकमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट  title=

नाशिक : नाशिकच्या सटाणा तालुक्यातील पश्चिम मोसम खोऱ्यातील गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने  शेतकऱ्यांची चांगलीच त्रेधा तिरपट उडाली.

सटाणा तालुक्यातील नामपूर, अंबासन, काकडगाव, द्याने, मौराणे, बीजोरसे, आसखेडा, वाघळे, गोरहाने या मोसम काटच्या गावांसह निरपूर, निकवेल, कंदाणे, तिळवण या पश्चिम पट्ट्यात सुमारे अर्धा तास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार झोडपून काढले.

गारपीट झाल्याने अनेक ठिकाणी गारांचा खच साचला होतो. गारपीट व पावसाने डाळींब, कांदा, आंबा, गहू तसेच कांदा बियाणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर शेतात काढून ठेवलेला कांदा अवकाळी पावसाने भिजला.