...जेव्हा 200 पदांसाठी 27 हजार अर्ज दाखल होतात!

बेरोजगारी कीती मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यातही सरकारी नोकरीचं आकर्षण कीती आहे, याचं उदाहरण पुण्यात समोर आलंय. समाज कल्याण विभागानं 200 जागांसाठी जाहिरात दिली. त्यासाठी तब्बल 27 हजार अर्ज आलेत. विशेष म्हणजे, या जागा 11 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात भरायच्या आहेत. 

Updated: Oct 10, 2015, 12:51 PM IST
...जेव्हा 200 पदांसाठी 27 हजार अर्ज दाखल होतात! title=

पुणे : बेरोजगारी कीती मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यातही सरकारी नोकरीचं आकर्षण कीती आहे, याचं उदाहरण पुण्यात समोर आलंय. समाज कल्याण विभागानं 200 जागांसाठी जाहिरात दिली. त्यासाठी तब्बल 27 हजार अर्ज आलेत. विशेष म्हणजे, या जागा 11 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात भरायच्या आहेत. 

पुण्यातील समाज कल्याण विभागाचं कार्यालय सध्या गर्दीनं फुलून गेलंय. आवारात गर्दी, जिन्यात गर्दी, पॅसेजमध्ये गर्दी… सर्वत्र गर्दीच गर्दी. हजारोंच्या संख्येने आलेले हे उमेदवार इथं नोकरीच्या मुलाखतीसाठी आले. उमेदवारांची संख्या आहे 27 हजार आणि नोकऱ्या आहे फक्त, दोनशे… त्यातही जी पदं भरली जाणार आहेत त्यासाठी पात्रता आहे पोस्ट ग्रॅज्युएशन... तरीही हजारोंच्या संख्येनं उमेदवार इथं दाखल झालेले पाहायला मिळाले.  

समाज कल्याण विभागाला तालुका समन्वयक अशी दोनशे पद भरायची आहेत. त्यासाठी पात्रता आहे पोस्ट ग्रॅज्युएशनची... ही नोकरीदेखील तात्पुरत्या स्वरुपाची असणार आहे. म्हणजेच केवळ अकरा महिन्यासाठी... त्यानंतर  मिळेल की नाही माहित नाही... आणि मानधन असणार आहे महिना 25 हजार रुपये... तरीही पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या उमेदवारांचा याला उदंड प्रतिसाद लाभलाय. हा प्रतिसाद एव्हढा होता की, आधी एकत्रित होणाऱ्या मुलाखती आता विभागानुसार घेण्याची वेळ आली असल्याची माहिती महासंचालक डी आर परिहार यांनी दिलीय. 

याला 'बेरोजगारी' म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? हा आकडा काय दर्शवतोय?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.