सिगारेट दिली नाही म्हणून हॉटेलची तोडफोड

उल्हासनगरमधल्या एका हॉटेल मध्ये सिगारेट दिली नाही याचा मनात ठेऊन रात्रीच्या सुमारास तोडफोड करण्यात आली आहे.

Updated: Dec 8, 2016, 07:03 PM IST
सिगारेट दिली नाही म्हणून हॉटेलची तोडफोड title=

उल्हासनगर : उल्हासनगरमधल्या एका हॉटेल मध्ये सिगारेट दिली नाही याचा मनात ठेऊन रात्रीच्या सुमारास तोडफोड करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कँप नंबर 4 भागातील हरीश  बारमध्ये काल रात्री साडे अकराच्या सुमाराला 16 जणांच्या टोळक्याने लाकडी दांडक्याने ही तोडफोड केली.

दोन दिवसांपूर्वी सिगारेट न देण्यावरून झालेल्या वादातून ही तोडफोड करण्यात आली. यावेळी  टोळक्याने बार मालक हरेश मेहरचंदानी आणि  मैनेजर अब्दुल मुहम्मद यानाही जबर मारहाण केली आहे. नवीन बजाज, नवीन केसवानी, किसन आणि इतर त्यांचे 10 ते 12 साथीदाराने  ही तोडफोड केली आहे. या प्रकरणी अजून कोणालाही अटक झालेली नाही.