मुंबई: येत्या काळ्यात शिवसेनेला एकट्यानंच लढण्याची तयारी करावी लागणार असल्याचं स्वतः उद्धव ठाकरेंनी म्हटलंयची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या विधानसभा २०१४ मधील सर्व पराभूत उमेदवारांची शिवसेना भवनात बैठक झाली. या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते, मंत्री, जिल्हा संपर्क प्रमुख उपस्थित होते.
सर्वांना आपापल्या मतदारसंघात तयारीला लागण्याचे आदेश देण्यात या बैठकीत देण्यात आले. मतदारसंघातील जनतेची कामं वेगाने सुरू करा, आपण जरी सत्तेत असलो तरी जनतेच्या समस्यांसाठी रस्त्यांवर उतरून आंदोलन करा. लोकप्रतीनिधींनी जनतेसाठी रस्त्यांवर उतरले पाहीजे, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचं समजत आहे.
शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत केली. आता तेच भाजप शिवसेना संपवायला निघाली आहे. विधानसभा निवडणुकीत देशभरातील भाजपची सत्ता शिवसेना संपवायला महाराष्ट्रात आली होती. ते असं करतील असं वाटलं नव्हतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाल्याचं सूत्रांनी म्हटलंय.