युतीचे जोखाड द्या फेकून - उद्धव ठाकरे

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन करताना म्हटले आहे, पुढील वर्षी महापालिका निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्यासाठी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा आणि युतीचे जोखड फेकून द्या.

Updated: Apr 25, 2016, 08:46 PM IST
युतीचे जोखाड द्या फेकून - उद्धव ठाकरे title=

नाशिक : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन करताना म्हटले आहे, पुढील वर्षी महापालिका निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्यासाठी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा आणि युतीचे जोखड फेकून द्या.

दरम्यान, छोटी राज्ये निर्माण करण्याचा भाजपचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. 

शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही. आमची भाजपबरोबर युती सत्तेसाठी नव्हे, तर हिंदुत्व टिकविण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट करून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला धारेवर धरले. ठाकरे यांच्या भाषणात केंद्र सरकार आणन भाजपवर टीकेचा रोख होता. 

दुष्काळ म्हणतात आणि हेलिकॉप्टरसाठी पाणी खर्च करतात, यावरून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला. केंद्र सरकारवर टीका करताना विधानसभा निवडणुकीपूर्वी दुष्काळ पाहण्यासाठी केंद्रातून आलेले नेते आता पुन्हा आले तर दुष्काळ संपेल अशी उपरोधिक टीका केली.