उद्धव ठाकरे घाबरले आहेत : चंद्रकांत पाटील

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घाबरले आहेत, अशी टीका महसूलमंत्री आणि जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 8, 2017, 06:36 PM IST
उद्धव ठाकरे घाबरले आहेत : चंद्रकांत पाटील title=

जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घाबरले आहेत, अशी टीका महसूलमंत्री आणि जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. 

जळगाव जिल्हा परिषद तसंच पंचायत समितीच्या निवडणुकीचा जाहीरनामा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा सामना करण्यासाठी गुजरातचा हार्दिक पटेल कशाला पाहिजे, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. 

मुंबई मनपावर भाजपचा झेंडा फडकणारच याबाबत पाहणी अहवाल आला आहे. त्यामुळे शिवसेना जे जे करता येईल, ते ते करत आहे, असेही पाटील म्हणालेत.