पुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे ही माणसं समाज प्रबोधनाचं काम करत होती. त्यांच्यावर गोळीबार होणं ही शोकांतिका आहे. सरकार कोणतं होतं याच्याशी मला देणं- घेणं नाही. पानसरेंचे मारेकरी सापडल्यास त्यांना तातडीने गोळ्या घाला, असं रोखठोक मत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते.
“दाभोलकर, पानसरे यांचे मारेकरी सापडत नाहीत हे दुर्दैव आहे. शिवाजी महाराज हे सर्वसमावेशक होते हीच भूमिका पानसरेंनीही मांडली. मात्र त्यांच्यावर गोळीबार होतो, ही शोकांतिका आहे. राजकारण्यांनी याचा गंभीर विचार करून, या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी तातडीने पावलं उचलावी. या मारेकऱ्यांना गोळ्या घाला”, असं उदयनराजे म्हणाले.
सरकारला चॅलेंज
जमीन अधिग्रहण कायदा, ऊस दर अशा अनेक विषयांवर उदयन राजेंनी चौफेर फटकेबाजी केली. जमिन सुधारणा विधेयक अन्यायकारक...मी याला विरोध करणार...माझं केंद्र सरकारला चॅलेंज आहे....कुठलीही चर्चा न करता विधेयक लादलं तर लोक काय करतील सांगता येत नाही, असाही सूचक इशारा उदयनराजे यांनी दिला.
चहावाल्यांशी पण बोललो...
जमीन सुधारणा विधेयकाचा मुद्दा आता पेटणाराय....मी याबाबत तज्ञांशीही चर्चा केली आणि चहावाल्यांशी पण चर्चा केली....चहावाल्यांचा पण याला विरोधाय..बाकीच्यांसाठी एम.पी. म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट....पण मी म्हणजे मिलिट्री पोलीस.....इतका राग येतोय की नक्षलाईट मूव्हमेंटपण लीड करायला मागं पुढं बघणार नाही....
यांना ऑस्कर द्या
राजकारणी सर्वात जास्त नाटकी...निवडणुकांवेळी गरीबांचा कळवळा आल्याच दाखवतात आणि सत्तेत आल्यावर विसरतात...बॉलीवूड - हॉलीवूडपेक्षा पॉलीवूड भारीय....ऑस्कर पुरस्कार यांनाच मिळाला पाहिजे...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.