इलेक्ट्रिकचा शॉक लागून दोन चिमुकल्या बहिणींचा जागीच मृत्यू

नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकात्मता नगर येथे दोन सख्या बहिणींचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. 

Updated: Nov 22, 2014, 07:52 PM IST
इलेक्ट्रिकचा शॉक लागून दोन चिमुकल्या बहिणींचा जागीच मृत्यू title=

नागपूर : नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकात्मता नगर येथे दोन सख्या बहिणींचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. 

रिद्धिमा आणि सिद्धीमा पंचेश्वर अशी या मृत बहिणींची नावे आहेत. रिद्धिमाचे वय अवघं ४ वर्ष आहे तर सिद्धीमा अवघ्या दीड वर्षाची... या दोन्ही मुलींना गमावल्यानं तिच्या मात्या-पित्यावर दु:खाचं आभाळच कोसळलंय.  

ठेकेदारीचा व्यवसाय करणारे राजेश पंचेश्वर काही कामा निमित्ताने घराबाहेर गेले असता या दोघी बहिणींनी घरात पडलेला वायरचा तुकडा इलेक्ट्रिकच्या स्विच मध्ये टाकला. वायरचा तुकडा दोन्ही बाजूने उघडा असल्याने 4 वर्षाच्या रीद्धीमाला जोरदार विजेचा धक्का लागला आणि त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर सिद्धीमाने रीद्धीमाला स्पर्श केल्याने तिला सुद्धा विजेचा धक्का लागला आणि तिचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.  दोघींच्या मृत्यूने संपूर्ण हिंगणा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.