नाशिक : जिल्ह्यात टोमॅटो दोन रुपये किलोने विकले जात असल्याने शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे.
टोमॅटो सर्वाधिक निर्यात होत होता तो पाकिस्तानात. मात्र सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात संपूर्णपणे बंद आहे. चलन कल्लोळाने हवालदिल झालेला शेतकरी टोमॅटो पीकाचे भाव कोसळल्याने आर्थिक अडचणीत आला आहे.
टोमॅटोला प्रतिएकरी दीड ते दोन लाख रुपये खर्च होत असतो. मात्र आजच्या बाजारभावानुसार टोमॅटो विक्रीने झालेला खर्च निघणार किंवा नाही अशा संभ्रमावस्थेत शेतकरी सापडला आहे.