कल्याण / डोंबिवली : भिवंडीचे भाजप आमदार कपिल पाटील यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत, शिवसेनेशी युती करण्याचा प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून घेतला जाणार असल्याचं म्हटलं आहे, कार्यकर्त्यांची देखील भाजप- शिवसेना एकत्र येण्याची इच्छा आहे. यासाठी चर्चा होणे गरजेचे आहे, चर्चेतून मार्ग निघेल असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला.
कल्याण डोंबिवलीत मॅजिक फिगर 62 असून हा आकडा कोणालाही पार करता आलेला नाही. त्यामुळे दोन समिकरणात मनसेचा रोल खूप महत्त्वाचा आहे. पण भाजप सेनेने युती केली तर मनसे विरोधी पक्षात बसेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.