ट्रक-बसची धड़क, 20 जण गंभीर

 ट्रक आणि बसची समोरासमोर धड़क होऊन 20 जण गंभीर जखमी झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील महाकाळा येथे घडली.

Updated: Nov 4, 2015, 07:47 PM IST
ट्रक-बसची धड़क, 20 जण गंभीर title=

जालना :  ट्रक आणि बसची समोरासमोर धड़क होऊन 20 जण गंभीर जखमी झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील महाकाळा येथे घडली.

औरंगाबादहून ऊसतोड़ मजूर घेऊन निघालेला ट्रक बीडकड़े जात होता. तेव्हा बीडहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या बसने ट्रकला समोरून धड़क दिली. या अपघातात बस आणि ट्रक या दोन्हीही वाहनांमधील 20 प्रवाशी गंभीर झाले.

अपघातात जखमी झालेल्या ऊसतोड मजूर आणि इतर प्रवाशांना तातडीनं अंबड़ आणि गेवराई येथील शासकीय रूग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.