पुणे महापालिकेत पारदर्शक कारभाराच्या दिशेने पाऊल

महापालिकेत भाजपने पारदर्श कारभाराच्या दिशेने एक पाऊल टाकले गेले आहे. स्थायी समितीच्या बैठकीला आता पत्रकारही उपस्थित राहू शकणार आहेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 5, 2017, 10:28 PM IST
पुणे महापालिकेत पारदर्शक कारभाराच्या दिशेने पाऊल title=

पुणे : महापालिकेत भाजपने पारदर्श कारभाराच्या दिशेने एक पाऊल टाकले गेले आहे. स्थायी समितीच्या बैठकीला आता पत्रकारही उपस्थित राहू शकणार आहेत. 

स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी हा निर्णय घेतला आहे. महापालिकेतील आर्थिक निर्णय, विविध टेंडर स्थायी समितीत मंजूर होतात. त्यामुळे स्थायी समितीचा कारभार पारदर्शी असावा आणि या बैठकांना पत्रकारांना प्रवेश मिळावा, अशी मागणी होती.

स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी निर्णय घेत पत्रकारांना उपस्थित राहण्यास परवानगी दिलीय. विरोधकांनीही या निर्णयाचं स्वागत केले आहे.