मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी

सलग सुट्ट्यांमुळे मुंबईकरांनी सुट्ट्यांचे चांगलेच बेत आखलेत. फिरायला निघालेल्या या पर्यटकांमुळेमुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर चांगलीच वाहतूक कोंडी झाली आहे. 

Updated: Dec 25, 2015, 04:55 PM IST
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी  title=

मुंबई : सलग सुट्ट्यांमुळे मुंबईकरांनी सुट्ट्यांचे चांगलेच बेत आखलेत. फिरायला निघालेल्या या पर्यटकांमुळेमुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर चांगलीच वाहतूक कोंडी झाली आहे. 

पेण खोपोली राज्यमार्गावरही गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर बोरघाटातूनही वाहनं अडकून पडली आहेत. 

शनिवार रविवारची जोडून आलेली सुट्टी, यामुळे साहजिकच पर्यटनाचे बेत आखले गेले आहेत. त्याचा फटका एक्स्प्रेस वेवर वाहतुकीला बसलेला पाहायला मिळतोय.