बुलडाणा अपघातात तीन भाविकांचा मृत्यू

क्रुझरने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला. ही घटना कुक्सा गावाजवळ घडली.

Updated: Jan 30, 2016, 06:03 PM IST
बुलडाणा अपघातात तीन भाविकांचा मृत्यू  title=

बुलडाणा : क्रुझरने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला. ही घटना कुक्सा गावाजवळ घडली.

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब इथले काही नागरिक शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते. नागपूर- औरंगाबाद महामार्गावरुन जात असताना वळण रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून क्रुझर गाडी धडकल्याने हा अपघात झाला. 

या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार तर ६ प्रवासी गंभीर जखमी झालेत. जखमींवर मेहकर इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ट्रकचे टायर फुटल्याने गेल्या तीन दिवसांपासून हा ट्रक या वळण रस्त्यावरच उभा करून ठेवलाय. त्यामुळंच हा अपघात घडला असून त्याला ट्रकचालकच सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.