फेसबुकमुळं ३० वर्षांनंतर तिनं घडवली आई-वडिलांची भेट!

एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही वास्तव कथा नगरमध्ये घडली. गोपालकृष्णा कुडपुडी हे मूळचे आंध्र प्रदेशातील काकीनाडा गावचे. तिथं पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत होते. तिथून नाशिकला आल्यानंतर ग्रीन हॉटेलमध्ये बारमॅन म्हणून नोकरी केली. हॉटेल मालकानं त्यांना मुंबईत हॉटेल व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं. नंतर मुंबईतील बांद्रा हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी पत्करली.

Updated: Nov 23, 2014, 04:14 PM IST
फेसबुकमुळं ३० वर्षांनंतर तिनं घडवली आई-वडिलांची भेट! title=

अहमदनगर: एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही वास्तव कथा नगरमध्ये घडली. गोपालकृष्णा कुडपुडी हे मूळचे आंध्र प्रदेशातील काकीनाडा गावचे. तिथं पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत होते. तिथून नाशिकला आल्यानंतर ग्रीन हॉटेलमध्ये बारमॅन म्हणून नोकरी केली. हॉटेल मालकानं त्यांना मुंबईत हॉटेल व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं. नंतर मुंबईतील बांद्रा हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी पत्करली.

याच काळात फाल्गुनी नावाच्या तरुणीची आणि त्यांची ओळख झाली़ त्यातून त्यांचं प्रेम फुललं पण फाल्गुनीच्या कुटुंबियांना हा विवाह मान्य नव्हता. म्हणून दोघांनी नाशिकमध्ये नोंदणी पद्धतीनं विवाह करून ते मुंबईत वास्तव्यास आले.

विवाहानंतर त्यांना सपनादेवी हे कन्यारत्न झालं सर्वकाही सुरळीत असतानाच दोघांमध्ये अचानक वाद सुरू झाले वाद विकोपाला गेल्यानं कायदेशीर घटस्फोट न होता ३० वर्षांपूर्वी गोपालकृष्णा यांनी पत्नीला मुंबईतच सोडत नगर गाठलं होतं. सध्या ते नगरच्या हॉटेल यश पॅलेसमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. मात्र या काळात त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची कधीच गाठभेट झाली नाही.

या दिवाळीत गोपालकृष्णा यांनी स्मार्ट फोन घेऊन फेसबुक अकाउंट उघडलं. त्यांना फेसबुकवर अनोळखी महिलेचे मॅसेज येऊ लागले. त्यांच्याबद्दल माहिती विचारली जाऊ लागली. चर्चेनंतर गोपालकृष्णा यांना ती आपली मुलगी सपनादेवी असल्याचं कळलं तेव्हा दोघांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू तराळले ऑस्ट्रेलिया इथं वास्तव्यास असलेल्या सपनानं आईवडिलांचं मिलन घडवून आणण्याचा निर्धार केला. आणि आई-वडिलांना पुन्हा एकदा विवाहाच्या बंधनात अडकवलं.

दोघांनीही पुन्हा विवाह न केल्यानं त्यांना मोठा आनंद झाला. पुन्हा त्यांनी एकत्र येण्याचं ठरवलं. फाल्गुनीबाई नगरला येऊन पतीला भेटल्या. दोघांनीही शिर्डीला जाऊन साई समाधीचं दर्शन घेत यापुढं एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि ते पुन्हा एकदा विवाहाच्या बंधनात अडकले. सपना या ऑस्ट्रेलिया इथं वास्तव्यास मुलीनं वडील गोपालकृष्णा यांचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक मिळवून मुंबईत आईला पाठवला. तब्बल ३० वर्षानंतर या दाम्पत्याचं फोनवर बोलणं झालं आणि दोघांचं मनोमिलन झालं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.