पुणे : पुण्यातल्या हिंजेवाडीमध्ये बेपत्ता झालेल्या तीन महिलांचं गूढ उकललंय. या तिघीही महिला स्वेच्छेनंच घर सोडून गेल्याचं समोर आलंय.
पिंपरी चिंचवड मधल्या हिंजवडीतून गायब झालेल्या तीन महिलांना अखेर पोलिसांनी नातेवाईकांकड सुखरूप ताब्यात दिलंय. कौटुंबिक त्रासाला कंटाळून नोकरीच्या शोधात घराबाहेर पडलेल्या या तिघींनी अपहरणाचा बनाव रचला होता.
अठ्ठावीस तारखेच्या दुपारी दवाखान्यात जाण्याच्या बहाण्यान या तिघी घरातून बाहेर पडल्या आणि माघारी परतल्या नव्हत्या. प्रतिभा हजारे, मंगला इंगळे आणि विद्या खाडे अशी या तिघींची नावे आहेत.
हिंजेवाडी मधून मुंबई, दिल्ली, गुजरात, सुरत आणि भुसावळ असा प्रवास या महिलांनी केला. गेल्या सहा दिवसात महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरात या तिन्ही राज्यात त्या नोकरीच्या शोधात भटकत होत्या.
दरम्यान, या तिघींनी मोबाइलवरून अनेकांशी संपर्क साधला आणि इथेच त्यांचा प्लान फसला. पोलिसांनी त्यांचे मोबाइल लोकेट करून यां तिघींचा शोध लावला. तिघींनी अपहरणाचा बनाव केल्यान पोलिसांची मात्र चांगलीच पळतापळ झाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.