पुणे : राष्ट्रवादीचे नगरसेवक तसंच महापालिकेतील सभागृह नेते सुभाष जगताप यांचया घरावर आज एसीबीनं छापा टाकला. जगताप यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली.
जगताप यांचे सहकार नगर परिसरात घर आहे. लाचलुचपतखात्याच्या १५ ते २० अधिका-यांची टीम त्यांच्या घराची झडती घेत आहे. पहाटे पाच वाजल्यापासून ही करवाई सुरू आहे. जगताप यानी २००७ ते २०१३ दरम्यान सुमरे १ कोटी १५ लाखांची अवैध संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या तसंच कुटुबियांच्या नावावर पुण्यासह इतर ठिकणी मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता आहे.
जगताप यांच्याकड़े अवैध संपत्ती आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरोधात सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय..दरम्यान जगताप यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते रवि बर्हाटे यांनी महसूलमंत्री एकनाथ खड़से यांच्या माध्यमातून रचलेले हे कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.