महानायक अमिताभ बच्चन हे खरे 'रिअल हिरो' मानतात

बहुतांश वेळेस कौटुंबिक दबावामुळे बाळाची आई रडायची.

Updated: Jan 31, 2016, 05:11 PM IST
महानायक अमिताभ बच्चन हे खरे 'रिअल हिरो' मानतात title=

पुणे : पुण्याचे डॉक्टर गणेश राख यांना महानायक अमिताभ बच्चन हे खरे 'रिअल हिरो' मानतात. पुणेकरांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे. डॉ. राख यांना लहानपणी पहेलवान होण्याची इच्छा होती, पण डॉ.राख यांचा पहेलवानी 'खुराक' पुरवण्याची ऐपत त्यांच्या आई-वडिलांकडे नव्हती.

वडील धान्य बाजारात हमाल होते, तर आई दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करत होती, तेव्हा डॉ.राख यांचं पहेलवान होण्याचं पहिलं स्वप्न भंगलं.

गणेश राख हे डॉक्टर झाले, डॉ.राख यांनी २००७ साली पुण्यात हॉस्पिटल सुरू केलं, मात्र पेशंटच्या मृत्यूची बातमी देण्यापेक्षाही, मोठं धैर्य मुलगी झाल्याचं नातेवाईकांना सांगणे, हे आहे की काय असे त्यांना वाटू लागले, कारण मुलगी झाल्यानंतर नातेवाईकांचा चेहरा उतरत असे, बहुतांश वेळेस कौटुंबिक दबावामुळे बाळाची आई रडायची.

यावर डॉक्टर निराश झाले, त्यांनी मुलगी झाल्यावर आनंद साजरा करण्याची योजना आखली. मुलगी झाली तर प्रसुतीची फी घ्यायची नाही, हे त्यांनी ठरवलं. मुलगी झाली की डॉक्टर केक मागवतात, आणि मुलीच्या आई-वडिलांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करतात.

भारतात १९६१ मध्ये ७ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या हजार मुलांमागे ९७६ मुली होत्या, २०११ च्या जनगणनेनुसार त्या आता फक्त ९१४ आहेत. 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी भ्रुण हत्येला 'राष्ट्रीय शर्म' म्हटलं होतं. कन्या बचावचं आव्हान केलं होतं. ३ जानेवारीपासून डॉ. राख यांनी या अभियानाला सुरूवात केली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या रूग्णालयात ४५४ मुली जन्माला आल्या आहेत.

५० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून शेतमजूर त्यांच्या रूग्णालयात प्रसृतीसाठी येतात, कारण डॉक्टर पैसे घेत नाहीत, हे त्यांना माहित आहे, आजही गरीबांसाठी मुलगा असो किंवा मुलगी, यापेक्षा त्यांना आपत्य आणि कमी पैशात उपचार होणे महत्वाचं वाटतं.