ठाण्यातील राष्ट्रवादीच्या 'त्या' नगरसेवकांच्या पाठिशी पक्ष उभा

येथील बांधकाम व्यावसायीक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अडचणीत आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतलाय. यासंदर्भात मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निर्णय़ घेण्यात आला. 

Updated: Jan 19, 2016, 07:44 PM IST
ठाण्यातील राष्ट्रवादीच्या 'त्या' नगरसेवकांच्या पाठिशी पक्ष उभा title=

ठाणे : येथील बांधकाम व्यावसायीक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अडचणीत आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतलाय. यासंदर्भात मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निर्णय़ घेण्यात आला. 

पक्षाचा निर्णय झाल्यानंतर लगेचच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अटकेत असलेला राष्ट्रवादीचा नगरसेवक नजीब मुल्ला याच्या समर्थनार्थ ठाण्यात पोस्टरबाजी सुरू केली.  दरम्यान, आव्हाड यांच्यावरही आरोप होत असल्याने ते गप्प होते. मात्र, पुन्हा ते सक्रिय झाल्याची चर्चा ठाण्यात आहे.

काही दिवसांपूर्वी पक्षाचे नेते पाठिशी नसल्याची नाराजी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पत्रातून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षनेतृत्वाने नगरसवेकांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला.