...तर मी राजकारण सोडेन – अजित पवार

 सांगलीतील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांना शिंगावर घेतले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं. दुष्काळी मदत मंत्र्यांच्या नेत्यांना मिळाली हा फडणवीसांचा आरोप खरा निघाला तर, मी राजकारण सोडेन अन्यथा फडणवीसांनी राजकारणातून बाजूला व्हावं असं आव्हान त्यांनी दिलंय. 

Updated: Aug 11, 2014, 09:22 PM IST
...तर मी राजकारण सोडेन – अजित पवार title=

सांगली : सांगलीतील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांना शिंगावर घेतले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं. दुष्काळी मदत मंत्र्यांच्या नेत्यांना मिळाली हा फडणवीसांचा आरोप खरा निघाला तर, मी राजकारण सोडेन अन्यथा फडणवीसांनी राजकारणातून बाजूला व्हावं असं आव्हान त्यांनी दिलंय. 

मोदीप्रमाणे देवेंद्र फडणवीसही थापाडे झाले आहे. दुष्काळी मदत निधीबाबत ते जे आरोप करीत आहे त्यात तथ्य नाही, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. 

शिवसेनेच्या खासदाराना कश्याची मस्ती आली आहे. रोजा असताना मुस्लिम बांधवाला चपाति कशी भरवता. राज आणि उद्धव ठाकरे हे राज्याचं नेतृत्व करू शकतात काय?  त्यांनी कोणती संस्था काढली आहे काय? 

या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वच नेते आक्रमक झाले होते. पाहूया काय बोलले राष्ट्रवादीचे नेते. 


 

आर. आर. पाटील 
गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपले कट्टर प्रतिस्पर्धी, भाजप खासदार संजयकाका पाटील यांना थेट आव्हान दिलंय... आगामी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालो तर मी राजकारण सोडेन, अशी घोषणा आर. आर. पाटील यांनी सांगलीत बोलताना दिली. याउलट जर मी बहुमताने निवडून आलो तर संजय पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, असं आव्हान आर. आर. आबांनी दिलंय. 

राष्ट्रवादी सोडून भाजपा-शिवसेनेत जाणाऱ्या नेत्याना शुभेच्छा. नेते गेल्यामुळे आमच्या पक्षात उरलेल्या नेत्याना चांगले भविष्य आहे. अन्य पक्षातून नेते आयात करण्यापेक्षा आमच्या पक्षातील नेत्याना आम्ही मोठ करू असे ही आबांनी सांगितले आहे. 

गृहमंत्री आर आर पाटिल यांची वृत्तवाहिन्यावर टीका केली आहे. देशातील १८ वाहिन्या आणि काही पेपर मध्ये मोठ्या उद्योगपतींनी मोठी गुंतवणूक केली आहे. सर्वच क्षेत्रात उद्योगपतींचे राज्य येण्याचा धोका आहे. 
मोदी हे निवडून आल्यावर पाकिस्तानातून भारतीय जवानांचे कापलेले शीर आणणार होते. मात्र मोदीनीं निवडून आल्यावर, पाकिस्तानातून आपल्याला आईला साडी आणली आहे. 


 

ग्रामविकासमंत्री जयंत पाटील
खुर्चीवर बसल्यावर खुर्चीची मर्यादा काय आहे हे कळत असत. मनमोहन सिंग बोलत नाहीत असे म्हणणारे, नरेन्द्र मोदी सुद्धा पंतप्रधान झाल्यावर गप्प झालेत. मोदींच बोलण आता कमी झालं आहे. 
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी नेपाळला दहा हजार कोटी रूपये देण्याचे जाहीर केले, पण पाच हजार कोटी जरी सिंचन योजनांना त्यांनी दिले असते,  तर दुष्काळ हटवण्यासाठी त्याची मदत झाली असती. मोदी कदाचित पाकिस्तानात जावून त्याना सुद्धा मदत करण्याच जाहीर करू शकतात. 

काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीची ताकत मोठी आहे, त्यामुळे विरोधी नेते हे केवळ राष्ट्रवादीच्या नेत्यांवरच टीका करतात. ताकतवान नेत्यांना टार्गेट करून प्रसिद्धी मिळवली जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.