संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा, सरकारवर जोरदार टीकास्त्र

राज्यातल्या विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा सुरु झाला. कोल्हापूरमधून या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. 

Updated: Apr 25, 2017, 11:02 PM IST
संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा, सरकारवर जोरदार टीकास्त्र title=

कोल्हापूर : राज्यातल्या विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा सुरु झाला. कोल्हापूरमधून या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. 

या संघर्ष यात्रेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुनील तटकरे आणि इतरही विरोधी पक्षांचे नेते सहभागी झालेत. या सर्व नेत्यांनी सकाळी कोल्हापुरात शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला भेट दिली. त्यानंतर महालक्ष्मी मंदिरात श्री महालक्ष्मी देवीचं दर्शन घेत संघर्ष यात्रेच्या तिस-या टप्प्याचा शुभारंभ केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कर्जमाफीची सुबुद्धी दे असं साकडं यावेळी नेत्यांनी देवीला घातलं. त्यानंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. कर्जमाफी आणि तूर खरेदीच्या मुद्यावरुन सर्व नेत्यांनी सरकारला लक्ष्य केलं.