पुणे : पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे एक सहा मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एकजण आडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.
भुमकर नगरमधील 'सिताराम' असं या इमारतीचं नाव असून या इमारतीमध्ये आठ कुटुंब रहात होती. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास इमारतीचा काही भाग कोसळा तेव्हा इथल्य रहिवाशींनी तात्काळ इमारतीतून पळ काढला त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. मात्र ढिगा-याखाली एक जण अडकल्याची माहिती रहिवाशांनी दिली आहे.
अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य वेगानं सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.