अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील थळ येथील आरसीएफ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना अजूनही नोकरी देण्यात आलेली नाही. आपल्याला न्याय न मिळाल्याने आजपासून 'करो या मरो ठिय्या' आंदोलनाला १४२ प्रकल्पग्रस्तांनी सुरूवात केली आहे.
३० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिलेल्या १४२ प्रकल्पग्रस्तांचा अजूनही नोकरीसाठी लढा सुरू आहे. यासंदर्भात अनेकवेळा मोर्चे, आंदोलनं झाली. वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करूनही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता हे प्रकल्पग्रस्त प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत धरणं आंदोलनाला बसलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.