ठाण्यातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू

 पालिका उपायुक्त संदीप माळवी यांना मारहाण झाल्यानंतर पालिका प्रशासन आता आक्रम झाले आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 11, 2017, 08:38 PM IST
ठाण्यातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू title=

(कपिल राऊत, झी मीडिया) ठाणे : गावदेवी परिसरात आज फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई करण्यात आली आहे. पालिका उपायुक्त संदीप माळवी यांना मारहाण झाल्यानंतर पालिका प्रशासन आता आक्रम झाले आहे. मारहाणीनंतर पालिकेत एक महत्वाची बैठक झाली. 

या बैठकीत हल्ल्याचा निषेध करत ठाणे 100% फेरीवाला मुक्त करणार असा निर्धार करण्यात आला.  त्या अनुषंगाने आज ज्या दुकानामुळे संदीप माळवी यांना मारहाण झाले ते एकविरा पोळीभाजी केंद्र सह आजूबाजूच्या 7 दुकानांना सील ठोकल असून त्याच्या शेड पाडण्यात आल्या. यासाठी पोलीस दल व पालिका कर्मचारी वर्गाची मोठी फौज तैनात करण्यात आली होती.