केंद्रीय दारुगोळा भांडाराला भीषण आग

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडाराला भीषण आग लागलीये. 

Updated: May 31, 2016, 08:02 AM IST
केंद्रीय दारुगोळा भांडाराला भीषण आग  title=

पुलगाव : वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडाराला भीषण आग लागलीये. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून त्यामुळे परिसरातील गावांना जबरदस्त हादरे बसत आहेत. या आगीत १९ जण जखमी झालेत.

या आगीत प्रचंड क्षमतेच्या बॉम्बचे स्फोट होत आहेत. त्यामुळे कॅम्प  परिसरालगतच्या १५ किमी परिघातील गावांमध्ये दहशतीच वातावरण आहे. कॅम्प परिसरालगतच्या नागझरी भागाला ही आग लागली.

या आगीमुळे इंझाळा, पिपरी, आगरगाव, मुरदगावसह सुमारे १५ गावांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरु आहे.