ठाणे : महानगरपालिकेतील वृक्ष प्राधिकरणाच्या हजारो झाडांची कत्तल झाली होती. ही कत्तल राज्य सरकारनं बेकायदा ठरवली आहे. ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वृक्ष प्राधिकरणाच्या झाडांची कत्तल करण्याचा निर्णय झाला होता.
मात्र वृक्ष प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा अधिकार केवळ पालिका आयुक्तांनाच असल्याचं सरकारनं काढलेल्या पत्रकात म्हटलंय. त्यामुळं अतिरिक्त आयुक्तांनी घेतलेला वृक्षतोडीचा निर्णय बेकायदेशीर ठरलाय. याविरोधात ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडं तक्रार केली होती.