ठाणे शहर पोलिसांकडून नोकरी सेंटर

ठाणे पोलीस आयुक्तालय, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र एकत्रितपणे हा उपक्रम राबवत आहेत. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 1, 2017, 05:57 PM IST
 ठाणे शहर पोलिसांकडून नोकरी सेंटर  title=

ठाणे : शैक्षणिक योग्यता असतानाही अनेक कंपन्यांत नोकरीसाठी मुलाखत देऊन रिकाम्या हातानं घरी परतणाऱ्या मुलांमध्ये नैराश्येचं वातावरण असतं. 

या नैराश्येतून तरुणांना बाहेर काढण्यासाठी ठाणे पोलीस सरसावले आहेत. त्याचाच भाग म्हणून पोलिसांच्या मुलांना त्वरीत नोकरी मिळवून देण्यासाठी, ठाणे शहर पोलिसांन नोकरी सेंटर सुरु केलं आहे. 

ठाणे पोलीस आयुक्तालय, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र एकत्रितपणे हा उपक्रम राबवत आहेत. 

ठाण्यासह, मुंबई, नवी मुंबई परिसरातल्या ५० कंपन्यांमध्ये, पोलिसांच्या आठवी उत्तीर्ण ते पदवीधर तसंच उच्चशिक्षीत मुलांना हमखास नोकरी मिळवून देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.