भिवंडी : भिवंडीचा माणकोली नाका हा कारचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. खुद्द ठाण्याच्या जिल्हाधिका-यांनाही तिथल्या ट्रॅफीकचा फटका बसला आहे. जिल्हाधिकारी कल्याणकर माणकोली इथल्या गोडाऊनना वेळेच्या मर्यादेची नोटीस देण्यासाठी चालले होते. मात्र या प्रवासात ते स्वतः वाहतूक कोंडीत अडकले.
अखेर वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिका-यांचा ताफा नियम पायदळी तुडवत राँग साईडने निघाला. जिल्हाधिकारी स्वतःच वाहतुकीचे नियम तोडत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.