उपचारात दिरंगाई, ठाणे सिव्हिल रुग्णालयाची जमावाकडून तोडफोड

तरुणावर चॉपरने हल्ला, ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करताना वरिष्ठ डॉक्टर नसल्याने शिकाऊ डॉक्टरकडून उपचार करत होते. दरम्यान, उपचारात दिरंगाई झाल्याने जमावाकडून रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 29, 2017, 06:25 PM IST
उपचारात दिरंगाई,  ठाणे सिव्हिल रुग्णालयाची जमावाकडून तोडफोड title=

ठाणे : तरुणावर चॉपरने हल्ला, ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करताना वरिष्ठ डॉक्टर नसल्याने शिकाऊ डॉक्टरकडून उपचार करत होते. दरम्यान, उपचारात दिरंगाई झाल्याने जमावाकडून रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली.

ठाण्यातील महागिरी येथे मारहाणीत एक मुज्जू नावाच्या तरुणावर चॉपरने हल्ला झाल्याने त्याला उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे कोणीही वरिष्ठ डॉक्टर नसल्याने शिकाऊ डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते मात्र ते देखील उपचारात दिरंगाई करत असल्याने मुज्जू सोबत आलेल्या तरुणांच्या टोळक्यांनी रुग्णालयात धिंगाणा घातला.

तसेच तेथील डॉक्टरांना मारहाण करीत रुग्णालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आणि घटनास्थळी पोलीस पोहोचण्याच्या अगोदरच तेथून ते पसार झाले. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी डॉक्टर आणि कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला. एमर्जन्सनी सेवा उपलब्ध राहणार आणि ओपीडी सेवा बंद करणार असल्याचे सिव्हिल डॉक्टरांनी सांगितले.