नागपूरमध्ये 25-30 गुंडाचा तलवारी घेऊन नंगानाच, गाड्यांची तोडफोड

शहरामध्ये गुंडांचा दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला. पोलीस ठाण्याजवळ भर रस्त्यावर 25-30 गुंडांचा तलवारी घेऊन धुमाकूळ घालत गाड्यांचीही तोडफोड केली. ही गुंडगिरी सीसीटीव्हीत कॅमे-यात कैद झाली आहे.

Updated: May 21, 2015, 06:03 PM IST
नागपूरमध्ये 25-30 गुंडाचा तलवारी घेऊन नंगानाच, गाड्यांची तोडफोड title=

नागपूर : शहरामध्ये गुंडांचा दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला. पोलीस ठाण्याजवळ भर रस्त्यावर 25-30 गुंडांचा तलवारी घेऊन धुमाकूळ घालत गाड्यांचीही तोडफोड केली. ही गुंडगिरी सीसीटीव्हीत कॅमे-यात कैद झाली आहे.

नागपूरमध्ये गुंडगिरीने कळस गाठलाय. गुंडांच्या टोळक्याने एका घरावर आणि नंतर एका कारवर दिवसाढवळ्या हल्ला चढवला. हातात नंग्या तलवारी घेऊन गुंडांनी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरावर हल्ला चढवला. त्यानंतर घराच्या आवारात उभ्या असलेल्या स्विफ्ट कारची जोरदार तोडफोड केली. 

नागपूरच्या म्हाडा वसाहतीत असलेल्या संतोष यादव याच्या पानटपरीवर झालेल्या क्षुल्लक वादातून गुंडांनी हा भयाण हल्ला चढवला आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून गुंडांचा हा हैदौस समोर येतोय. आपल्यावर हल्ला झालाय हे लक्षात आल्यावर संतोष यादव लपून बसला. त्यानंतर या गुंडांनी स्विफ्ट गाडी आणि दुचाकीचा अक्षरशः चुराडा केलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.