शिक्षकांच्या बदलीची फाईल गायब, लिपिकाची चौकशी

जिल्हा परिषदेने २०१३ मध्ये २२० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवून प्रशासनाने २०१५ मध्ये या बदल्या रद्द केल्या. 

Updated: Aug 31, 2016, 07:58 PM IST
शिक्षकांच्या बदलीची फाईल गायब, लिपिकाची चौकशी title=

गडचिरोली : जिल्हा परिषदेने २०१३ मध्ये २२० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवून प्रशासनाने २०१५ मध्ये या बदल्या रद्द केल्या. 

या बदल्यांना शिक्षकांनी उच्च न्यायालयातून स्थगनादेश मिळविला. परंतु बदली झालेल्या उपरोक्त २२० शिक्षकांपैकी तब्बल ७३ शिक्षकांच्या बदल्यांच्या फाईल्स गायब असल्याचं निदर्शनास आलं होतं.

यासंदर्भांतील पोलीस तक्रारीच्या चौकशीला वेग आला असून एका लिपिकाला ताब्यात घेण्यात आले आहे.