कोल्हापूर : गेल्या 13 दिवसापासून राज्यात सुरू असलेलं 15 हजार शिक्षकांचं आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. उद्यापासून या शिक्षकांनी महामार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनंतर आता शिक्षकांच्या आत्महत्या बघायला मिळतील असा इशाराही आंदोलकांनी दिलाय.
गेल्या बारा वर्षापासून हे शिक्षक विनपगारी काम करतायंत. अर्थसंकल्पात अनुदान मंजूर होऊनही शासन निर्णय झालेला नाही. 15 जूनपासून शाळा सुरु होणार असल्या तरी आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. या आंदोलनाचा फटका एक हजार सहाशे सव्वीस शाळांना बसलाय. दरम्यान उद्यापासून हे आंदोलन महामार्गावरही करण्यात येणार आहे. दरम्यान कोल्हापूरातही गेल्या 13 दिवसांपासुन हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून आज विनाअनुदानीत शिक्षकांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर ढोल आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये कोल्हपूर जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
शासन आमदार आणि खासदारांच्या पेन्शनवर कोट्यावधी रुपये खर्च करतं मग मुलाचं भविष्य घडविणा-या शिक्षांच्या प्रश्नाकडं गाभीर्यानं का पहात नाही असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्या शिक्षकांनी विचारला.