पालखीच्या स्वागतासाठी काटेवाडी पायघड्यांसह सज्ज

Updated: Jun 28, 2014, 01:27 PM IST
पालखीच्या स्वागतासाठी काटेवाडी पायघड्यांसह सज्ज title=

 

पुणे : माऊलींची पालखी आज लोणंदमध्ये असेल तर तुकोबांच्या पालखीसाठी आज काठेवाडी सज्ज झालीय. सकाळी दहाच्या सुमारास तुकोबांची पालखी काठेवाडीत दाखल होईल. 

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात दाखल झाल्यानंतर परिट समाजाकडून धोतराच्या पायघड्या घालून स्वागत करण्याची पद्धत आहे. 125 वर्षांपासून ही प्रथा चालत आलीय. संत गाडगे महाराजांच्या शिकवणुकीतून ही परंपरा सुरू झाल्याचं सांगितलं जातं.

काटेवाडी गावच्या वेशीजवळ आल्यानंतर पालखी खांद्यावर घेण्यात येते. त्या वेळी ग्रामस्थ पायघड्या घालून पालखीचं स्वागत करतात. यावेळी घराघरांबाहेरही रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जातात, फाट्यावरून पालखी सुमारे दोन किलोमीटरवरील मुक्काम तळापर्यंत पालखी खांद्यावरूनच नेण्यात येते. यावेळी ग्रामस्थ रस्त्याच्या दुतर्फा पायघड्या घातलात. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.