तापीत बेकायदेशीर वाळू उत्खनन, पाण्याची पातळी खालावली

तापी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी एकमेवर नदी आहे, म्हणूनच की काय या नदीला सूर्यकन्येची उपमा दिली जाते. मात्र तापीतून बेसुमार वाळूचा उपसा होत असल्याने अमळनेर तालुक्यातील विहिरींची पातळी खोल जाण्यास सुरूवात झाली आहे.

Updated: Apr 20, 2015, 06:42 PM IST
तापीत बेकायदेशीर वाळू उत्खनन, पाण्याची पातळी खालावली title=

जळगाव : तापी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी एकमेवर नदी आहे, म्हणूनच की काय या नदीला सूर्यकन्येची उपमा दिली जाते. मात्र तापीतून बेसुमार वाळूचा उपसा होत असल्याने अमळनेर तालुक्यातील विहिरींची पातळी खोल जाण्यास सुरूवात झाली आहे.

शेतकऱ्यांना याचा सर्वात मोठा फटका बसतोय. वाळूचे डंपर ओव्हरलोड असल्याने तापीकाठचे रस्ते सर्वत्र खराब होत आहेत. या रस्त्यांवरून मोटरसायकल चालवणे देखिल कठीण झाले आहे, हे डंपर रस्ते अपघातांना आमंत्रण देत आहेत.

ओव्हरलोड वाळूंची वाहतुकीकडे महसूल विभागाचे अधिकारी, पोलिस आणि आरटीओने 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष केल्याचं सांगण्यात येतंय. तापीनदीच्या पात्रात परवानगी नसतांना जेसीबी मशीन्स उतरवून वाळूचं खालपर्यंत खोदकाम केलं जातंय.

वाळूचा ठेका देण्यात आला आहे, त्यात जेवढा ब्रास वाळू द्यायची आहे, त्यापेक्षा जास्त वाळू खोदण्यात आली आहे, तसेच वाळूचे खोदकाम सुरूच असल्याचं सांगण्यात येतंय.

सॅटेलाईटमध्ये तापीच्या जळोद गावाजवळील पात्रात एकाच वेळेस २५ ट्रक आणि दोन जेसीबी दिसून येतात. जेसीबी जळोद पुलावरूनही सहज नजरेस पडतात, हे कुणाच्या आशीर्वादाने चाललंय हा प्रश्न उपस्थित होतोय.

हा बेसुमार, बेकायदेशीर चालू असलेला वाळू उपसा शेतकऱ्यांच्या उरावर बसलाय, तापीपासून आठ किलोमीटर क्षेत्रातील विहिरीच्या पाण्याची पातळी झपाट्याने खाली जातेय, त्याला बेसुमार आणि खोलपर्यंत केला जाणारा वाळू उपसा जबाबदार असल्याची चर्चा आहे. पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी नदीतली वाळू महत्वाची असते, ती वाळूच बेकायदेशीरपणे ओरबाडली जात असल्याने हे संकट उभं राहिलं असल्याचं सांगण्यात येतंय.

यावर जिल्ह्यातील अमळनेर महसूल, पोलिस आणि आरटीओंनी झोपेचं सोंग घेतलं असल्याचं सांगण्यात येतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.