औरंगाबाद : जिल्ह्यात पुरवठा विभागातल्या एका तहसिलदाराला २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
अभय म्हसके असं या तहसिलदाराचं नाव आहे. एका रेशन दुकानदाराला मंजूर असलेला रॉकेलचा कोटा सुरळीत ठेवण्यासाठी, अभय म्हसकेनं ही लाच मागितली होती.
विशेष म्हणजे सापळा रचून जिल्हाधिकारी कार्यालयातच, त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर अभय म्हसके याच्या बीड आणि औरंगाबादमधल्या घरांवर एसीबीकडून छापा टाकण्याता आलाय तर चौकशी सुरु आहे.
भ्रष्ट सरकारी अधिका-यांच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचा बडगा उगारलाय. वर्ग १, वर्ग २ आणि वर्ग ३ मधील २८ भ्रष्ट सरकारी अधिका-यांना तातडीनं सेवामुक्त करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.