मुंबई : मुंबईत स्वाईन फ्लूमुळे गेल्या १५ दिवसांत ४ जणांचा बळी गेलाय. मुंबईत १९ जानेवारी २०१५ पासून आतापर्यंत स्वाईन फ्लूचे २३ रुग्ण आढळून आले आहेत. यात मुंबईच्या १० रहिवाशांचा समावेश असून बाहेरून उपचार घेण्यासाठी १३ रुग्ण आलेले आहेत. बाहेरून आलेल्या १३ रुग्णांपैकी ४ जणांचा मृत्यू झालाय. तर पाच जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय.
नागपूर, जळगाव पाठोपाठ पिंपरी चिंचवड शहरातही स्वाईन फ्लूची लागण झालेली पाहायला मिळतेय. पिंपरीमध्ये एका ४८ वर्षांच्या महिलेचा स्वाईन फ्लूनं बळी घेतलाय. कृष्णकुमारी असं या मुळच्या आंध्र प्रदेशच्या असलेल्या महिलेचं नाव आहे. पिंपरी चिंचवड मधला या वर्षातला स्वाईन फ्लूचा हा दुसरा बळी ठरलाय. दरम्यान स्वाईन फ्लू बाधीत एकाची प्रकृती चिंताजनक असून, दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या आजाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याची सूचना पालिकेनं केलीय.
पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूबाबत एक जानेवारी २०१५ पासून आतापर्यंतच्या आकडेवारीवर एक नजर टाकूयात...
तपासणी - १ लाख २ हजार ४३१
सर्दी आणि खोकला - ६ हजार ८८९
संशयित - १६४
एडमिट - १३
लागण झालेले - ४
अतिदक्षता विभाग - २
व्हेन्टीलेटर - १
मृत्यू - २
आत्तापर्यंत दोघांचा बळी गेला असला तरी जानेवारीपासून च्या संशयित रुग्णाचा आकडा पाहता स्वाइन फ्लूचा धोका वाढत असल्याच स्पष्ट झालंय. हा धोका पाहता प्रशासनान पूर्ण तयारी केलीय. तसेच नागरिकांना ही सतर्कतेचा इशारा देत काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.