रिक्षातून मारली होती उडी, स्वप्नालीच्या प्रकृतीत सुधारणा

आपला जीव वाचवण्यासाठी चालत्या रिक्षातून उडी घेणा-या स्वप्नाली लाड हिच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झालीय. ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. आज तिला डिस्चार्ज मिळला.

Updated: Sep 3, 2014, 03:26 PM IST
रिक्षातून मारली होती उडी, स्वप्नालीच्या प्रकृतीत सुधारणा title=

ठाणे : आपला जीव वाचवण्यासाठी चालत्या रिक्षातून उडी घेणा-या स्वप्नाली लाड हिच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झालीय. ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. आज तिला डिस्चार्ज मिळला.

स्वप्नाली आता बोलू शकते. तसंच तिनं  तिच्या कुटुंबीयांनाही ओळखलंय. मात्र तिला दुर्घटनेबद्दल काहीच आठवत नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासात अडथळे येऊ शकतात.

ठाण्यात एका रिक्षाचालकानं तिला दुस-याच रस्त्याला नेलं होतं त्यावेळी स्वप्नालीनं जीव वाचवण्यासाठी चालत्या रिक्षातून उडी घेतली होती. स्वप्नाली 1 ऑगस्टपासून कोमात होती. 

चालत्या रिक्षातून उडी मारल्यानंतर कोमात गेलेली स्वप्नाली लाड ही तरुणी तब्बल 21 दिवसांनंतर शुद्धीवर आली. अपघातानंतर ती कोमात होती. अद्यापही, स्वप्नालीवर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.