सांगली : ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.
८०:२०च्या फॉर्मुल्यानुसार दर देण्यास साखर कारखान्यांनी तयारी दर्शवली आहे. त्यामुळं सांगलीत सकाळपासून सुरु असलेलं आंदोलन मागे घेण्यात आले. याआधी स्वाभिमानी संघटनेनं चक्का जाम आंदोलन करुन वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला होता.
दुसरीकडे नागेवाडी साखर कारखान्यानं ऊसाचा पहिला हप्ता एफआरपीप्रमाणे दोन हजार रुपये जाहीर केल्याची माहिती खासदार संजय पाटील यांनी दिलीय.