स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत जाणार - राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही विचार करुन निर्णय घेऊ असे शेट्टी म्हणाले होते. आज आपला निर्णय त्यांनी जाहीर केला.

Updated: Sep 26, 2014, 12:02 PM IST
स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत जाणार - राजू शेट्टी  title=

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही विचार करुन निर्णय घेऊ असे शेट्टी म्हणाले होते. आज आपला निर्णय त्यांनी जाहीर केला.

भाजपने अधिकच्या जागा मागत जबरदस्त खेळी करत शिवसेनेशी असलेला घरोबा तोडला. शिवसेनेच्या जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार सेटींग केले. मात्र, त्यात अपयश आल्याने युतीच संपुष्टात आणली.  चार घटकपक्षांना देण्यासाठी जागा कोणत्या पक्षाकडे जास्त आहेत ते पाहून त्यांच्यासोबत आम्ही जाऊ असं स्पष्ट मत राजू शेट्टी यांनी मांडले होते. घटकपक्ष आणि भाजप यांच्या असलेल्या महायुतीत आम्हाला आता सन्मान मिळेल असं राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी म्हटलंय. तर रिपाइं नेते रामदास आठवले मात्र आज निर्णय घेणार आहेत. 

घटस्थापनेच्या मुहूर्तावरच शिवसेना-भाजप युतीत घटस्फोट झाला. १९८९ पासून सुरू असलेला शिवसेना-भाजपचा संसार अखेर मोडीत निघाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी युती तुटल्याची अधिकृत घोषणा केली. राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि  शिवसंग्राम हे घटकपक्ष भाजपसोबत राहणार असून, रिपब्लिकन पक्षासोबत अंतिम वाटाघाटी सुरू आहेत, असे फडणवीस म्हणालेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.