एक निर्णय : कुठे काळे झेंडे तर कुठे सत्कार!

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आज पहिल्यांदाच अर्थमंत्री आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार शहरात दाखल झाले होते.  

Updated: Jan 21, 2015, 05:34 PM IST
एक निर्णय : कुठे काळे झेंडे तर कुठे सत्कार! title=

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आज पहिल्यांदाच अर्थमंत्री आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार शहरात दाखल झाले होते.  

यावेळी, सुधीर मुनगंटीवार यांना लिकर डिलर्स असोसिएशनच्या सदस्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं... या सदस्यांनी मुनगंटीवार यांना काळे झेंडे दाखवले. 

'अनेक वर्षांपासून आम्ही याच व्यवसायात आहोत. आमच्या पोटापाण्याचं काय?' असा प्रश्न  लिकर डिलर्स संघटनेनं मुनगंटीवार यांना विचारला. 

तर, याउलट दुसरीकडे सामाजिक संघटनांनी मुनगंटीवारांचा सत्कार करत दूध वाटून आपला आनंद साजरा केला. 

दरम्यान, काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी दारुबंदीच्या निर्णयाला अपशकून करू नये असं आवाहन, मुनगंटीवार यांनी केलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.