गर्भलिंग निदान, मुंडे दाम्पत्याला चार वर्षांची शिक्षा

गर्भलिंग निदान प्रकरणी परळी येथील डॉ सुदाम मुंडे आणि डॉ सरस्वती मुंडे या दाम्पत्याला चार वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सप्टेंबर 2010 मध्ये लेक लाडकी अभियानाच्या प्रमुख अॅड वर्षा देशपांडे यांनी स्टिंग ऑपरेशन करून हे प्रकरण बाहेर काढले होते. 

Updated: Jun 15, 2015, 11:27 PM IST
गर्भलिंग निदान, मुंडे दाम्पत्याला चार वर्षांची शिक्षा  title=

बीड : गर्भलिंग निदान प्रकरणी परळी येथील डॉ सुदाम मुंडे आणि डॉ सरस्वती मुंडे या दाम्पत्याला चार वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सप्टेंबर 2010 मध्ये लेक लाडकी अभियानाच्या प्रमुख अॅड वर्षा देशपांडे यांनी स्टिंग ऑपरेशन करून हे प्रकरण बाहेर काढले होते. 

मुंडे यांना वेगवेगळ्या गुह्यात प्रत्येकी सहा महीने शिक्षा आणि 80 हजार रूपये दंड परळी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी सुनावला आहे. 

परळीतील डॉ सुदाम आणि सरस्वती मुंडे यांना परळीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एल जी पाचे यांनी आज वेगवेगळ्या ८ कलमाखाली प्रत्येकी ६ महिन्याच्या कैदेची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे या सगळ्या शिक्षा त्यांना वेगवेगळ्या भोगायच्या आहेत

काय आहे प्रकरण

२०१० मध्ये बेटी बचाव अभियानाच्या वर्षा देशपांडे यांनी परळी मधल्या मुंडे हॉस्पिटलचे स्टिंग ऑपरेशन केले होते. यात बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान केल्याचे निष्पन्न झाले होते. या वेळी महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंडे हॉस्पिटलची तपासणी केली. त्या वेळी गर्भलिंग निदान चाचणीचे रेकॉर्ड अध्यायावत ठेवले नसल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वेळी वेगवेगळ्या ८ कलमा खाली गुन्हा दाखल झाला होता.

याच प्रकरणाचा निकाल आज लागला या वेळी परळी कोर्टाच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एल जी पाचे यांनी प्रत्येक कलमाखाली ६ महिने कैद आणि १० हजाराचा दंड ठोठावला होता.. विशेष म्हणजे ही सगळी शिक्षा वेगवेगळी भोगावी लागणार आहे

बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात प्रकरण न्यायप्रविष्ट असताना डॉ सरस्वती मुंडे या जामीन वरती सुटल्या होत्या तर सुदाम मुंडे हे नाशिक जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.