धक्कादायक: वर्गातच बारावीच्या मुलीची गळफास लावून आत्महत्या

अहमदनगरच्या नेवासा फाटाजवळच्या त्रिमूर्ती कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. बारावीत शिकणाऱ्या तेजस्विनीनं तिच्या वर्गातच गळफास लावून आत्महत्या केली. 

Updated: Oct 29, 2015, 12:38 PM IST
धक्कादायक: वर्गातच बारावीच्या मुलीची गळफास लावून आत्महत्या title=

अहमदनगर: अहमदनगरच्या नेवासा फाटाजवळच्या त्रिमूर्ती कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. बारावीत शिकणाऱ्या तेजस्विनीनं तिच्या वर्गातच गळफास लावून आत्महत्या केली. 

आणखी वाचा - दारूच्या नशेत बहिणीवर अत्याचार करणाऱ्या मुलाची आईनंच केली हत्या

मूळची औरंगाबादची असलेली तेजस्विनी शिकायला त्रिमूर्ती कॉलेजला होती. तेजस्विनीच्या हातावर टी. गाडे असं लिहिलेलं होतं. पण तिचा मोबाईल कॉलेजच्या गर्ल्स बाथरूममध्ये सापडला. तिच्या आत्महत्येचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. 

आणखी वाचा - रायगडमध्ये मोटारसायकल स्फोटात पोलीस जखमी

दरम्यान, तेजस्विनीनं वर्गातच कशी काय आत्महत्या केली? ती वर्गात एकटीच होती का? असे प्रश्न तेजस्विनीच्या मृत्यूनंतर पडलेत. तसंच तेजस्विनीनं ज्या वर्गात आत्महत्या केली, त्याची उंची खूप आहे. त्यामुळं तिचा हात तिथवर कसा पोहोचला, असा सवालही उपस्थित होत आहे. या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचं काम पोलीस करत आहेत. पण ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.